Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 57

छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना

स्तोत्र. 108:1-5

दाविदाचे स्तोत्र

हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर,

कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत

तुझ्यात आश्रय घेतो.

मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो

त्याचा मी धावा करीन.

तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो,

जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो;

देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.

माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे;

ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,

आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे

अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.

हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो;

तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.

त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे;

माझा जीव वाकून गेला आहे;

त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे,

परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.

हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे;

मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.

हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो;

हे सतारी आणि वीणे, जागे व्हा;

मी पहाटेला जागे करीन.

हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन;

मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.

कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे

आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.

हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो;

तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.