Skip to content
BibleKenya

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

स्तोत्र 46

देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य

मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे.

देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,

जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.

म्हणून जरी पृथ्वी बदलली,

जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.

जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,

आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.

तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या

पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.

देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;

देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.

राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;

तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.

सेनाधीश परमेश्वर1 आमच्याबरोबर आहे.

याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.

या, परमेश्वराची कृत्ये पाहा,

त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;

तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;

तो रथ जाळून टाकतो.

शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;

राष्ट्रात मी उंचावला जाईन;

मी पृथ्वीवर उंचावला जाईन.

सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे;

याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.

Source notes (1)
  1. Footnote यहोवा-साबओथ

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.