Skip to content
BibleKenya

नहे

Nehemiah

Introduction from this edition

नहेम्या

लेखक

यहूदी परंपरा नहेम्याला (परमेश्वर विश्रांती देतो) या ऐतिहासिक पुस्तकाचा प्राथमिक लेखक म्हणून ओळखत आहे. बहुतेक पुस्तक त्याच्या पहिल्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. त्याच्या तरुणपणाबद्दल किंवा पार्श्वभूमीबद्दल काहीच माहिती नाही; आम्ही त्याला राजा अर्तहशश्त याच्या वैयक्तिक प्यालेबरदार म्हणून पारसी शाही न्यायालयातील प्रौढ म्हणून भेटतो (नहेम्या 1:11-2:1). नहेम्याच्या पुस्तकाला एज्राच्या पुस्तकाचा क्रमवार भाग म्हणजे मागोमाग येणारा भाग म्हणून वाचले जाऊ शकते, आणि काही विद्वानांचा असा विश्वास आहे की हे दोन्ही मूलतः एकच काम होते.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 457 - 400.

हे काम यहूदामध्ये, कदाचित यरूशलेममध्ये, किंवा पारसी काळात बाबेलमध्ये परत आल्यानंतर लिहिण्यात आलेले होते.

प्राप्तकर्ता

नहेम्याच्या उद्देशाने प्रेक्षक हे इस्राएलाचे वंशज होते जे बाबेल देशामध्ये बंदिवासातून परत आले होते.

हेतू

लेखकाला स्पष्टपणे हवे होते की त्याच्या वाचकांनी त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी देवावरील शक्ती व प्रेम आणि त्यांच्याकडे त्याच्या कराराच्या जबाबदाऱ्या ओळखणे आवश्यक आहे. देव प्रार्थनेचे उत्तर देतो तो लोकांच्या जीवनामध्ये स्वारस्य आहे, त्यांना त्याच्या आदेशांचे पालन करण्याची गरज आहे. लोकांनी एकत्र काम केले पाहिजे आणि त्यांचे स्त्रोत वाटले पाहिजे. देवाच्या अनुयायांच्या जीवनात स्वार्थीपणाला स्थान नाही. नहेम्याने श्रीमंत आणि उच्चकुलीन लोकांना गरिबांचा फायदा घेण्यास नकार दिला.

विषय

पुनर्रचना

रूपरेषा

1. राज्यपाल म्हणून नहेम्याचे प्रथम पद — 1:1-12:47

2. राज्यपाल म्हणून नहेम्याचे दुसरे पद — 13:1-31

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.