Skip to content
BibleKenya

विला

Lamentations

Introduction from this edition

विलापगीत

लेखक

विलापगीतचा लेखक पुस्तकात निनावीच राहतो. यहूदी आणि ख्रिस्ती परंपरा दोन्हीने यिर्मयासाठी लेखकत्वाचा दावा केला आहे. पुस्तकाचा लेखक यरूशलेमचा नाश करण्याच्या परिणामांविषयी साक्ष देतो, तो आक्रमणाचा स्वतः साक्षीदार आहे असे दिसते. (विलापगीत 1:13-15). यिर्मया दोन्ही घटनांसाठी उपस्थित होता. यहूदाने देवाविरुद्ध बंडखोरपणा केला आणि त्याच्याबरोबर त्याचा करार मोडला. देवाने आपल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी बाबेलच्या लोकांचा वापर करून प्रतिसाद दिला. पुस्तकात वर्णन केलेल्या मोठ्या दुःखाच्या कारणास्तव अध्याय तीन आशेचा एक आश्वासन देतो. यिर्मया देवाच्या चांगुलपणाची आठवण करतो. तो देवाच्या विश्वासातून सत्यतेच्या सहाय्यात सांत्वन देतो आणि आपल्या पाठकांना परमेश्वराच्या करुणा आणि कधी न संपणाऱ्या प्रेमाबद्दल सांगत असतो.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 586 - 584.

प्राप्तकर्ता

इब्री लोक निघून गेले आणि इस्त्राएल आणि सर्व पवित्र शास्त्राच्या वाचकांमध्ये परत आले.

हेतू

पाप, हे राष्ट्रीय आणि वैयक्तिक दोन्हींना परिणामकारक आहेत, देव लोकांना आणि परिस्थिती आपल्या अनुयायांना परत आणण्यासाठी वाद्याप्रमाणेच वापरतो, आशा फक्त देवामध्ये पसरते, फक्त जसे देवाने यहूद्यांना बंदिवासात सोडलेल्यांपैकी एकाचा बचाव केला ज्यामुळे त्याने त्याचा पुत्र येशू याच्यारुपात तारणहार दिला. पाप अनंतकाळचा मृत्यू आणते, पण देव तारणाच्या योजनेद्वारे अनंतकाळचे जीवन देतो. विलापगीत पुस्तकातून हे स्पष्ट होते की पाप आणि बंडखोरपणामुळे देवाचा क्रोध ओतला जाऊ शकतो (1:8-9; 4:13; 5:16).

विषय

विलाप

रूपरेषा

1. यिर्मयाचा यरूशलेमेसाठी शोक — 1:1-22

2. पापावर देवाचा क्रोध — 2:1-22

3. देव कधीही त्याच्या लोकांना सोडून देत नाही — 3:1-66

4. यरूशलेमचे वैभव गमावले जाणे — 4:1-22

5. यिर्मयाची लोकांसाठी मध्यस्थी — 5:1-22

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.