Skip to content
BibleKenya

शास्ते

Judges

Introduction from this edition

शास्ते

लेखक

शास्तेचे पुस्तके कोणी लिहिले याचे कोणतेही संकेत दिले जात नाहीत, परंतु यहूदी परंपरेने संदेष्टा शमुवेलला लेखक म्हणून नाव दिले आहे, शमुवेल हा शास्तेमध्ये शेवटी होता. शास्तेचा लेखक निश्चितच राजेशाहीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये राहिला होता. आवर्जून आलेले निवेदन, “त्या काळात इस्राएलमध्ये राजा नव्हता” (शास्ते 17:6; 18:1; 19:1; 21:25) या पुस्तकात आणि त्याच्या लिखाणाच्या काळात घडणाऱ्या घटनांमधील फरक दर्शवितात. शब्द “शास्ते” म्हणजे “उद्धारक.” मूलत: शास्ते हे इस्त्राएल लोकांना परराष्ट्रीय दडपशाहीपासून सुटका देणारे होते. त्यापैकी किमान काही जणांनी शासक आणि विवादांचे शास्ते म्हणून काम केले.

जुन्या करारातील शास्ते हे आजच्या समाजातील “प्रमुख” लोकांसारखे होते. त्यांनी केवळ लोकांमधील मतभेदांचा न्याय केला नाही, तर ते प्रामुख्याने पुढारी होते, ज्यांनी इस्राएलाला जीवनाचे दिशानिर्देश दिले.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ. पू. 1043 - 1000.

हे सर्वात संभाव्य दिसते की दाविदाच्या कारकिर्दीत शास्तेची पुस्तके संकलित केली गेली आणि त्याचा मानवी हेतू राजेशाहीचे फायदे प्रदर्शित करणे हे होते जेणेकरून यहोशवाच्या मृत्यूनंतर निष्फळ प्रणाली कार्यान्वित होते.

प्राप्तकर्ता

इस्त्राएली लोक आणि पवित्र शास्त्राचे भविष्यातील वाचक.

हेतू

इस्राएलच्या पहिल्या राजाच्या काळात भूमीवर विजय मिळविण्यापासून ऐतिहासिक काळ विकसित करणे, केवळ इतिहास सादर करणेच नव्हे तर शास्तेंच्या कालखंडावर एक धार्मिक दृष्टीकोन सादर करणे (24:14-28; 2:6-13), जरी लोकांनी त्याच्याशी केलेला करार मोडला आहे तरीसुद्धा अब्राहामशी केलेल्या कराराच्या संदर्भात देव विश्वासू आहे, लोकांना याची आठवण करून देण्यासाठी की परमेश्वर आपल्या कराराशी निष्ठावान आहे आणि तो न्यायाधीश किंवा राजा नाही, जर प्रत्येक पिढीमध्ये दुष्टाईने लढण्यासाठी देव कोणीतरी उभा करत असेल (उत्पत्ती 3:15) तर शास्त्यांची संख्या पिढीच्या संख्येइतकी असेल.

विषय

बिघाड आणि सुटका

रूपरेषा

1. शास्तेंच्या अंतर्गत इस्राएलची परिस्थिती — 1:1-3:6

2. इस्राएल लोकांचे शास्ते — 3:7-16:31

3. इस्त्राएल लोकांच्या पापशक्तीचे प्रदर्शन — 17:1-21:25

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.