कल
Colossians
Introduction from this edition
कलस्सैकरांस पत्र
लेखक
कलस्सैकरांस पत्र हे पौलाचे वास्तविक पत्र आहे (1:1). प्रारंभिक मंडळीमध्ये, लेखकाबद्दल बोलतात ते सर्व लोक पौलाला संबोधून बोलतात. कलस्सै येथील मंडळी पौलाने स्वत: स्थापन केली नाही. पौलाचा एक सहकारी, कदाचित एपफ्रास, याने प्रथम कलस्सै येथे सुवार्ता गाजवली (4:12, 13). खोटे शिक्षक एका विचित्र आणि नवीन सिद्धांतासह कलस्सै येथे आले होते. त्यांनी मूर्तीपुजक तत्वज्ञान आणि यहूदी धर्मासह ख्रिस्तत्वात एकत्रित केले. ख्रिस्त सर्व गोष्टींवर आहे हे दाखवून देण्याच्या या चुकीच्या शिकवणीचा पौल विरोध करतो. नवीन करारामध्ये कलस्सैकरांस पत्राला सर्वात ख्रिस्त केंद्रीत पत्र म्हटले गेले आहे. यावरुन दिसून येते की येशू ख्रिस्त सर्व गोष्टींवर प्रमुख आहे.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 60.
रोममध्ये पहिल्यांदा तुरुंगात असताना पौलाने हे लिहिले असावे.
प्राप्तकर्ता
पौलाने या पत्रात कलस्सैमधील मंडळीला उद्देशून म्हटले आहे जसे कि “कलस्सै येथील ख्रिस्तातील संत व विश्वासू बांधवांना” (1:1-2), लायकस दरीच्या मध्यभागी इफिसहून शंभर मैल अंतरावरील मंडळी यांना लिहिले आहे. प्रेषिताने कधीही मंडळीला भेट दिली नव्हती (1:4; 2:1).
हेतू
पौलाने आपल्या वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी, संपूर्ण निर्मितीवर (1:15; 3:4) ख्रिस्ताचे परिपूर्ण, प्रत्यक्ष आणि सतत सार्वभौमत्व सांगून, विद्वत्तापूर्ण प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, कलस्सैमध्ये निर्माण झालेल्या धोकादायक पाखंडी सल्ल्याबद्दल सल्ला देण्यासाठी लिहिले ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून जीवन जगणे (3:5; 4:6) आणि मंडळीला आपल्या शिस्तबद्ध ख्रिस्ती जीवनांबरोबरच खोट्या शिक्षकांच्या धमकीच्या आशेवर विश्वासाने स्थिरता राखण्यासाठी प्रोत्साहित करणे. (2:2-5).
विषय
ख्रिस्ताची सर्वोच्चता
रूपरेषा
1. पौलाची प्रार्थना — 1:1-14
2. ख्रिस्तामध्ये व्यक्तीसाठी पौलाच्या शिकवणी — 1:15-23
3. देवाच्या योजना व उद्देशातील पौलाचा भाग — 1:24-2:5
4. खोटया शिकवणुकीबद्दल चेतावणी — 2:6-15
5. धमकावणाऱ्या पाखंडी लोकांशी पौलाचा सामना — 2:16-3:4
6. ख्रिस्तामध्ये नवीन मनुष्याचे वर्णन — 3:5-25
7. प्रशंसा आणि अभिवादन समाप्ती — 4:1-18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.