2 शमु
2 Samuel
Introduction from this edition
2 शमुवेल
लेखक
2 शमुवेल या पुस्तकाचा लेखक कोण आहे हे स्पष्ट नाही. तो मरण पावला म्हणून तो (लेखक) संदेष्टा शमुवेल होऊ शकत नाही. मूलतः, 1 आणि 2 शमुवेल ही पुस्तके एकच होती. सेप्टुआजिंटचच्या (पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या ग्रीक आवृत्तीमध्ये असे म्हटले आहे की 270 इ. मध्ये 70 भाषांतरकर्त्यांनी हे केले) भाषांतरकर्त्यांनी त्यांना दोन पुस्तकात विभाजित केले. म्हणूनच शौलाच्या मृत्यूनंतरची पहिली पुस्तके संपली आणि दुसऱ्याची सुरुवात दाविदाच्या राज्याशी झाली, दाविदाला यहूदाच्या गोत्रांचा राजा कसे बनवले गेले आणि नंतर त्याला सर्व इस्त्राएलाचा राजा बनवण्यात आले.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1050 - 722.
अनुवादानंतरच्या इतिहासाचा एक भाग म्हणून हे बाबेलच्या बंदिवासात लिहिले होते.
प्राप्तकर्ता
काही स्वरूपात, मूळ प्रेक्षक दावीद आणि शलमोन यांच्या काळात तसेच त्यांच्या पिढ्यांसमवेत राहिलेले इस्त्राएली असतील.
हेतू
2 शमुवेल हे दावीद राजाच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. हे पुस्तक त्याच्या ऐतिहासिक संदर्भात दाविदाचा करार ठेवते. दाविदाने यरूशलेमला इस्राएलचे राजकीय व धार्मिक केंद्र बनविले (2 शमुवेल 5:6-12; 6:1-17). परमेश्वराचे वचन (2 शमुवेल 7:4-16) आणि दाविदाचे शब्द (2 शमुवेल 23:1-7) देवाने दिलेल्या राज्याच्या महत्तीवर जोर दिला. तसेच मसीहाच्या सत्तारूढ प्रभुत्व भविष्यवाणीला सूचित केले.
विषय
एकीकरण
रूपरेषा
1. दाविदाच्या साम्राज्याचा उदय — 1:1-10:19
2. राज्याचे विभाजन — 11:1-20:26
3. परिशिष्ट — 21:1-24:25
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.