Skip to content
BibleKenya

2 पेत्र

2 Peter

Introduction from this edition

पेत्राचे दुसरे पत्र

लेखक

पेत्राचे दुसरे पत्र याचा लेखक 2 पेत्र 1:1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रेषित पेत्र आहे, तो 3:1 मध्ये दावा करतो, पेत्राचे दुसरे पत्र याचा लेखक येशूच्या रूपांतराचा साक्षीदार (1:16-18) असल्याचा दावा करतो सारांशित शुभवर्तमाना नुसार, पेत्र तीन शिष्यांपैकी एक होता जो येशूबरोबर (दुसरे याकोब आणि योहान होते) होता. पेत्राचे दुसरे पत्र याचा लेखक देखील त्यास संदर्भित करतो की तो हुतात्माचा मृत्यू (1:14) असल्याचे दिसते असे मानले जाते; योहान 21:18-19 मध्ये, कैदेच्या काळात पेत्राला शहीद केले जाईल अशी भविष्यवाणी येशूने केली होती.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 65 - 68.

हे बहुदा रोमहून लिहिले आहे जिथे प्रेषिताने आपल्या जीवनाच्या शेवटची काही वर्षे व्यथित केली.

प्राप्तकर्ता

हे कदाचित उत्तर आशिया मायनरमधील पहिल्या पेत्रासमान श्रोत्यांना लिहिले जाऊ शकते.

हेतू

पेत्राने ख्रिस्ती विश्वासाच्या तत्त्वाची आठवण करून देण्यासाठी (1:12-13, 16-21) आणि त्यांच्या शिक्षणाच्या परंपरेची पुष्टी करून विश्वासातील विश्वास ठेवणारे (1:15) भविष्यकाळातील पिढ्यांना निर्देशित करण्यासाठी लिहिले. पेत्राने आपला वेळ कमी असल्याचे म्हटले आणि पेत्राला हे माहीत होते की देवाच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला (1:13-14; 2:1-3), पेत्राने आपल्या वाचकांना खोटया शिक्षकांविरूद्ध चेतावणी दिली (2:1-22) जे लवकर येणाऱ्या परमेश्वराला नाकारतात (3:3-4).

विषय

खोट्या शिक्षकांविरूद्ध चेतावणी

रूपरेषा

1. अभिवादन — 1:1, 2

2. ख्रिस्ती गुणधर्मांमध्ये वाढ — 1:3-11

3. पेत्राच्या संदेशाचा उद्देश — 1:12-21

4. खोट्या शिक्षकांविरूद्ध चेतावणी — 2:1-22

5. ख्रिस्ताचे परतणे — 3:1-16

6. निष्कर्ष — 3:17, 18

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.