1 पेत्र
1 Peter
Introduction from this edition
पेत्राचे पहिले पत्र
लेखक
सुरुवातीचे वचन दर्शविते की, ख्रिस्त येशूचा प्रेषित पेत्र, लेखक आहे. जो स्वतःला येशू ख्रिस्ताचा प्रेषित म्हणतो. (1 पेत्र 1:1) ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल त्याचा वारंवार उल्लेख (2:21-24; 3:18; 4:1; 5:1) हे दाखवून देतो की दुःखी दासाचे रेखाकृती त्याच्या स्मृतीत गहिवरपणे कोरली गेली. त्याने मार्कला त्याचा “मुलगा” म्हटले (5:13), त्याने नमूद केलेल्या तरुण आणि कुटुंबाबद्दलचे स्नेह परत करणे (प्रेषित 12:12). प्रेषित पेत्राने हे पत्र लिहून ठेवलेले हे तथ्य नैसर्गिकरित्या गृहीत धरतात.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 60 - 64.
5:13 मध्ये लेखक बाबेलमधील मंडळीतून शुभेच्छा पाठवतो.
प्राप्तकर्ता
पेत्राने हे पत्र आशिया मायनरच्या उत्तरेकडील भागात पसरलेल्या ख्रिस्ती लोकांच्या एका गटाला लिहिले. त्याने लोकसमुदायातील एका समूहाला लिहिले, ज्यात कदाचित यहूदी व परराष्ट्रीय दोन्ही लोकांचा समावेश होता.
हेतू
पेत्राने आपल्या वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी असे लिहिले होते की ज्यांचा त्यांच्या विश्वासासाठी छळ होत आहे. तो त्यांना पूर्णपणे आश्वासन देऊ इच्छितो की ख्रिस्तत्व म्हणजे देवाची कृपा आहे आणि म्हणूनच विश्वास सोडू नये. 1 पेत्र 5:12 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे की, प्रोत्साहित करुन सांगतो की ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये स्थिर राहा. स्पष्टपणे हा छळ त्याच्या वाचकांदरम्यान व्यापक होता. 1 पेत्र उत्तर आशिया मायनरच्या संपूर्ण ख्रिस्ती लोकांच्या छळाला प्रतिबिंबित करते.
विषय
दुख:स प्रतिसाद देणे.
रूपरेषा
1. अभिवादन — 1:1, 2
2. त्याच्या कृपेबद्दल देवाला स्तुती करा — 1:3-12
3. जीवनातील पवित्रतेबद्दल उपदेश — 1:13-5:12
4. अंतिम अभिवादन — 5:13, 14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.