Skip to content
BibleKenya

1 करिं

1 Corinthians

Introduction from this edition

करिंथकरांस पहिले पत्र

लेखक

पौलाला या पुस्तकाचे लेखक मानले जाते (1 करिंथ. 1:1-2; 16:21) तसेच पौलाचे पत्र म्हणून देखील ओळखले जाते. काही वेळ आधी किंवा तो इफिसमध्ये असताना पौलाने करिंथकरांना हे पहिले पत्र लिहिले (1 करिंथ 5:10-11) आणि करिंथकरांना हे पत्र समजले नाही आणि दुर्दैवाने ते पत्र अस्तित्वात नाही. या “पूर्वीच्या पत्राची” (ज्याला म्हटले जाते) सामग्री पूर्णपणे ज्ञात नाही, प्रथम करिंथकरांना पौलाने करिंथ मंडळीकडून प्राप्त झालेल्या पत्राचे उत्तर म्हणून विचार केले आहे, ज्यामुळे ते या पूर्वीच्या पत्राच्या प्रतिसादाबद्दल कदाचित लिहिले होते.

तारीख आणि लिखित स्थान

साधारण इ.स. 55 - 56.

हे पत्र इफिसकडून लिहिले गेले (1 करिंथ. 16:8).

प्राप्तकर्ता

जरी पौल त्याच्या उद्देशाने वाचकांना “सगळीकडे आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक ठिकाणी बोलावतो” (1:2) तरी 1 करिंथकरांचे इच्छित वाचक “करिंथ येथील देवाच्या मंडळीचे” सदस्य होते. (1 करिंथ 1:2).

हेतू

करिंथ येथील मंडळीच्या सध्याच्या स्थितीविषयी पौलाला अनेक स्त्रोतांकडून माहिती मिळाली होती. हे पत्र लिहिण्याचा त्याचा हेतू हा होता की मंडळीला आपल्या क्षेत्रातील कमकुवतपणाची शिकवण देणे आणि पुनर्संचयित करणे (1 करिंथ 15), अनैतिकता, चुकीच्या शिकवणुकीसारख्या चुकीच्या पद्धती सुधारणे. (1 करिंथ 5, 6:12-20), आणि प्रभू भोजनाचा गैरवापर (1 करिंथ 11:17-34). करिंथ येथील मंडळीने भेट दिली होती (1:4-7) परंतु अपरिपक्व व अयोग्य (3:1-4), म्हणूनच पौलाने मंडळीच्या मध्यभागी पापांची समस्या कशी हाताळावी याबद्दल एक महत्त्वाची प्रतिकृती दिली. संबंधात विभाजन आणि सर्व प्रकारच्या अनैतिकतेच्या दृष्टीकोनातून डोळस वळण करण्याऐवजी त्यांनी समस्या सोडविल्या.

विषय

विश्वासू लोकांचे आचरण

रूपरेषा

1. परिचय — 1:1-9

2. करिंथ मंडळीत विभाजन — 1:10-4:21

3. नैतिक आणि नीतिविषयक मतभेद — 5:1-6:20

4. विवाह सिद्धांत — 7:1-40

5. प्रेषितीय मोकळीक — 8:1-11:1

6. आराधना व निर्देश — 11:2-34

7. आत्मिक वरदाने — 12:1-14:40

8. पुनरुत्थानावरील शिकवण — 15:1-16:24

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.