1 इति
1 Chronicles
Introduction from this edition
1 इतिहास
लेखक
1 इतिहासामधील पुस्तके विशेषत: आपल्या लेखकांचे नाव देत नाहीत, तर यहूदी परंपरेने एज्राला लेखक म्हणून श्रेय दिले आहे. 1 इतिहासाची सुरुवात इस्त्राएल लोकांच्या कुटुंबांची यादीपासून आहे. मग इस्त्राएल नावाच्या राष्ट्रावर दाविदाच्या शासनाच्या वृत्तानुसार हे पुस्तक पुढे चालू आहे, हे पुस्तक राजा दाविदाच्या कथेच्या जवळ आहे जी जुन्या करारातील एक महान आकृती आहे. प्राचीन इस्त्राएलचा राजकीय आणि धार्मिक इतिहास या व्यापक दृष्टिकोणातून येतो.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 450 - 400.
इस्त्राएल लोक बाबेल देशामध्ये परतल्यावर हे स्पष्ट होते. 1 इतिहास 3:19-24 यादीमध्ये जरुब्बाबेलच्या नंतर सहाव्या पिढीत दाविदची वंशावळ सुरू आहे.
प्राप्तकर्ता
प्राचीन यहूदी लोक आणि पवित्र शास्त्राचे नंतरचे वाचक.
हेतू
1 इतिहासाची पुस्तके हद्दपार झाल्यानंतर देवाची आराधना कशी करायची हे समजून घेण्यासाठी जे इस्त्राएलात परत आले त्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले. हा इतिहास दक्षिणेकडील राज्य, यहूदा, बन्यामीन आणि लेवी यांचे वंश यांच्यावर केंद्रित आहे. या जमाती देवाला अधिक विश्वासू असल्याचे भासले होते. दाविदाचे घर किंवा राज्य सदासर्वकाळ स्थापित करण्यासाठी देवाने आपला करार दाविदाशी केला. पृथ्वीवरील राजे करू शकत नाही यासाठी दावीद आणि शलमोन यांच्याद्वारे देवाने आपले मंदिर बांधले जिथे लोक आराधना करायला येऊ शकतील. शलमोनाच्या मंदिराचा बाबेलच्या शत्रूंकडून नाश करण्यात आला.
विषय
इस्त्राएलचा आध्यात्मिक इतिहास
रूपरेषा
1. वंशावळ — 1:1-9:44
2. शौलाचा मृत्यू — 10:1-14
3. दाविदाचा अभिषेक आणि राजवट — 11:1-29:30
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी. Copyright © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions. Licensed under CC BY-SA 4.0. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.