Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 64

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

हे परमेश्वरा, माझे गार्‍हाणे ऐका;

शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.

दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या

कारस्थानापासून मला लपवा.

तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात

आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.

दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात;

ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;

दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात;

सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात;

ते म्हणतात, “ते1 कोण पाहणार?”

ते कुटिल योजना बनवून म्हणतात,

“आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!”

मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.

परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील;

अचानक ते घायाळ होतील.

परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील

आणि त्यांचा नाश करतील.

जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.

मग सर्व मानव घाबरतील;

ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील;

आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.

पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील

व त्यांचा आश्रय घेतील,

सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!

Source notes (1)
  1. Footnote ते किंवा आम्हाला

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.