Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 46:10

Verse 10 is marked below, with the whole chapter around it. Read from the start

संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत.

परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;

संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.

पृथ्वी उलथीपालथी झाली

आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,

सागरांच्या जलांनी गर्जना केल्या,

आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला1

आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते;

तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात.

परमेश्वर स्वतः त्या नगरीत राहतात; ती नगरी अढळ राहील;

प्रभात होताच परमेश्वर साहाय्य करतील.

राष्ट्रे खवळली, राज्ये कोलमडली;

त्यांच्या मोठ्या गर्जनेने पृथ्वी विरघळून जाते.

सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;

याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा;

त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

दिगंतापर्यंत युद्धे

ते बंद करतात.

ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात;

ते रथांना2 अग्नीत भस्म करतात.

ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा;

राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल.

पृथ्वीवर माझी महिमा होईल.”

सर्वसमर्थ याहवेह आमच्याबरोबर आहेत;

याकोबाचे परमेश्वर आमचे दुर्ग आहेत. सेला

Source notes (2)
  1. Footnote सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे
  2. Footnote किंवा ढालींना

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.