Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

स्तोत्रसंहिता 14

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

मूर्ख1 आपल्या मनात म्हणतो,

“परमेश्वर नाही.”

ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत,

सत्कर्म करणारा कोणी नाही.

मानवांमध्ये कोणी समंजस आहे का?

परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का?

हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून

खाली पाहतात.

प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;

सत्कर्म करणारा कोणीच नाही,

एकही नाही.

दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय?

भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील.

ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.

पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत,

कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.

दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता,

परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.

अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!

जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील,

तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

Source notes (1)
  1. Footnote किंवा अनैतिक

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.