Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
मत्तय 1
येशू ख्रिस्ताची वंशावळी
अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची1 ही वंशावळी:
अब्राहाम इसहाकाचा पिता होता,
इसहाक याकोबाचा पिता,
याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता,
यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती.
पेरेस हेस्रोनचा पिता,
हेस्रोन अरामचा पिता,
अराम अम्मीनादाबाचा पिता,
अम्मीनादाब नहशोनाचा पिता,
नहशोन हा सल्मोनाचा पिता,
सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती,
बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती,
ओबेद इशायाचा पिता,
इशाय दावीद राजाचा पिता,
दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,
शलोमोन रहबामाचा पिता,
रहबाम अबीयाचा पिता,
अबीया आसाचा पिता,
आसा यहोशाफाटाचा पिता,
यहोशाफाट योरामाचा पिता,
योराम उज्जीयाहचा पिता,
उज्जीयाह योथामाचा पिता,
योथाम आहाजाचा पिता,
आहाज हिज्कीयाचा पिता,
हिज्कीयाह मनश्शेहचा पिता,
मनश्शेह आमोनाचा पिता,
आमोन योशीयाहचा,
योशीयाह यखन्या2 व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले.
बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर:
यखन्या शल्तीएलचा पिता,
शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता,
जरूब्बाबेल अबीहूदचा पिता,
अबीहूद एल्याकीमचा पिता,
एल्याकीम अज्जूरचा पिता,
अज्जूर सादोकाचा पिता,
सादोक याखीमचा पिता,
याखीम एलीहूदाचा पिता,
एलीहूद एलअज़ाराचा पिता,
एलअज़ार मत्तानाचा पिता,
मत्तान याकोबाचा पिता,
याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती.
अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
योसेफ येशूंना स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकारतो
येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा विवाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान3 होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.
परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू4 ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
योसेफाने जागा झाल्यावर, प्रभूच्या दूताने दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले आणि मरीयेला त्याची पत्नी म्हणून घरी आणले. तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.
Source notes (4)
- Footnote ख्रिस्त अर्थ अभिषिक्त
- Footnote यखन्या किंवा यहोयाखीन
- Footnote किंवा नियमांशी विश्वासू होता
- Footnote येशू हिब्री भाषेत यहोशुआ अर्थ याहवेह जे तारण करतात
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.