Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
यहोशुआ 19
शिमओनाचे वतन
दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते. त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे:
बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह, हसर-शुआल, बालाह, असेम, एलतोलाद, बेथूल, होरमाह, सिकलाग, बेथ-मर्काबोथ, हाझर-सूसाह, बेथ-लेबाओथ, आणि शारूहेन; ही तेरा नगरे आणि त्यांची गावे;
एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे; आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे.
शिमओन गोत्राच्या कुळांनुसार दिलेले वतन हे होते.
शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले.
जबुलूनाचे वतन
तिसरी चिठ्ठी जबुलून गोत्राच्या कुळांनुसार निघाली:
त्यांच्या वतनभागाची सीमा सारीदपर्यंत गेली होती. तिथून पुढे ती पश्चिमेकडे मरलापर्यंत व दब्बेशेथला जोडून पुढे योकनामच्या ओहोळास जाऊन पोहोचली. ती सारीदपासून वळून पूर्वेकडे उगवतीला किसलोथ-ताबोर याच्या सीमेपर्यंत जाऊन पुढे दाबरथ आणि याफीयापर्यंत गेली. तिथून पूर्व दिशेकडे गथ-हेफेर आणि एथ-काझीनपर्यंत येते; व तिथून रिम्मोनकडे येऊन नेआहकडे वळते. तेथील सीमा उत्तरेच्या बाजूंनी हन्नाथोनकडे जाते आणि इफ्ताह-एल खोर्यापर्यंत जाऊन संपते.
त्यात कट्टाथ, नहलाल, शिम्रोन, इदलाह आणि बेथलेहेम यांचा समावेश होता. ती बारा नगरे आणि त्यांची गावे होती.
ही नगरे व त्यातील गावे जबुलून गोत्राच्या कुळानुसार वतन होती.
इस्साखारचे वतन
चौथी चिठ्ठी इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार निघाली. त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता:
येज्रील, कसुल्लोथ, शूनेम, हफाराईम, शियोन, अनाहराथ, रब्बीथ, किशोन, एबेज, रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दाह आणि बेथ-पसेस.
ही सीमा ताबोर, शहसुमा आणि बेथ-शेमेश यांना लागून पुढे जाऊन यार्देनकडे समाप्त होते.
ही सोळा नगरे आणि त्यांची गावे होती.
ही नगरे आणि त्यातील गावे इस्साखार गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
आशेराचे वतन
पाचवी चिठ्ठी आशेर गोत्राच्या कुळांनुसार निघाली. त्यांच्या सीमेमध्ये समाविष्ट असलेली ही नगरे:
हेलकथ, हली, बेटेन, अक्षाफ, अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते. तिथून ती पूर्वेकडे बेथ-दागोनकडे वळून जबुलून आणि इफ्ताह-एल खोर्याजवळ जाते आणि उत्तरेकडे बेथ-एमेक आणि नेईएल तसेच डाव्या बाजूने काबूलकडे जाते. ती पुढे अब्दोन, रहोब, हम्मोन आणि कानाहाकडून मोठ्या सीदोनपर्यंत जाते. नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते, उम्माह, अफेक आणि रहोब यासहित.
यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता:
ही नगरे आणि त्यातील गावे आशेरच्या गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.
नफतालीचे वतन
सहावी चिठ्ठी त्यांच्या कुळांनुसार नफताली गोत्राची निघाली.
ही सीमा हेलेफ आणि साननीमातील मोठ्या एलावृक्षापासून पुढे अदामी-नेकेब आणि यबनेल ते लक्कूम आणि यार्देनपर्यंत समाप्त होते. पुढे पश्चिमेकडे अझनोथ ताबोरमधून जाते आणि हुक्कोक येथे निघते. दक्षिणेकडून ती जबुलूनजवळ, पश्चिमेकडून आशेरजवळ आणि पूर्वेकडून यार्देनच्या यहूदीया वतनभागाला जाऊन मिळते.
तटबंदीची नगरे सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ, अदमाह, रामाह, हासोर, केदेश, एद्रेई, एन-हासोर, इरोन, मिगदल-एल, होरेम, बेथ-अनाथ, व बेथ-शेमेश ही होती.
ही सर्व एकोणवीस नगरे आणि त्यांची गावे होती.
ही नगरे आणि त्यातील गावे नफताली गोत्राच्या कुळाप्रमाणे वतनभाग होती.
दानाचे वतन
सातवी चिठ्ठी दान गोत्राच्या कुळांनुसार निघाली. त्यांच्या वतनभागाची सीमा ही होती:
सोराह, एष्टाओल, ईर-शमेश, शालब्बीन, अय्यालोन, इथलाह, एलोन, तिम्नाह, एक्रोन, एल्तेकेह, गिब्बथोन, बालाथ, येहूद, बने-बराक, गथ-रिम्मोन, मे-यरकोन आणि रक्कोन, याबरोबरच याफोसमोर असलेला प्रदेश.
(जेव्हा दानच्या गोत्राची सीमा त्यांनी गमावली, तेव्हा त्यांनी जाऊन लेशेम शहरावर हल्ला करून ते हस्तगत केले, तलवारीने त्यांचा नाश केला व तिथे वस्ती केली. लेशेममध्ये ते स्थायिक झाले व त्या शहराला त्यांचा पूर्वज दानचे नाव दिले.)
ही नगरे आणि त्यातील गावे दानच्या गोत्राच्या कुळांनुसार त्यांचे वतन म्हणून मिळाले.
यहोशुआचे वतन
जेव्हा त्यांनी त्यांना दिलेल्या भागाची वाटणी करण्याचे संपविले, तेव्हा इस्राएली लोकांनी नूनाचा पुत्र यहोशुआला आपल्या वतनामध्ये वाटा दिला, याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली.
या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.