Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

यशायाह 4

त्या दिवसात सात स्त्रिया

एका पुरुषास धरून असे म्हणतील

“आम्ही स्वतःचे अन्न मिळवू

आणि स्वतःचे वस्त्र मिळवू;

आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे,

आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!”

याहवेहची शाखा

त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल. सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील. प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील. त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल. दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.