Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

होशेय 14

आशीर्वाद प्राप्तीसाठी पश्चात्ताप

हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये.

कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!

परमेश्वराच्या वचनांचे पालन कर

आणि याहवेहकडे परत ये.

त्यांना सांगा:

“आमच्या सर्व पापांची क्षमा करा,

आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा,

म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.1

अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही;

आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही.

हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही

‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही.

कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”

“मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन

आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन,

कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.

मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन.

तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल

आणि त्याची मुळे लबानोनातील

गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;

त्याच्या फांद्या पसरतील.

त्याचे वैभव एका जैतून वृक्षासारखे होईल.

त्याचा सुगंध लबानोनातील गंधसरू सारखा होईल.

लोक परत त्यांच्या छायेत विश्रांती घेतील;

ते धान्यासारखे पुनरुज्जीवित होतील,

द्राक्षवेलीप्रमाणे ते फळे देतील—

इस्राएलची प्रसिद्धी लबानोनच्या द्राक्षारसाप्रमाणे होईल.

हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे?

मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन.

मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे;

तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”

कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या.

कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या.

कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत;

नीतिमान त्यावरून चालतील,

पण पातकी त्यावर अडखळून पडतील.

Source notes (1)
  1. Footnote किंवा आमचे ओठ अर्पण करू

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.