Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
1 इतिहास 26
द्वारपाल
द्वारपालांचे विभाजन:
कोरहा पासून:
कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता. मशेलेम्याहचे पुत्र:
जखर्याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा,
जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,
एलाम पाचवा, यहोहानान सहावा
व एलिओएनाइ सातवा.
ओबेद-एदोमासही पुत्र होते:
शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा,
योवाह तिसरा, साखार चवथा,
नथानेल पाचवा, अम्मीएल सहावा,
इस्साखार सातवा व पउलथय आठवा.
(कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.)
ओबेद-एदोमाचा पुत्र शमायाहला सुद्धा पुत्र झाले, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, कारण ते सक्षम पुरुष होते. शमायाहचे पुत्र:
अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद;
आणि त्यांचे बंधू अलीहू आणि समख्याह हे सक्षम पुरुष होते.
हे सर्व ओबेद-एदोमाचे वंशज होते; ते आणि त्यांचे कुटुंब हे सर्वच सक्षम—काम करण्यास समर्थ पुरुष होते—ओबेद-एदोमाचे वंशज, सर्व मिळून 62.
मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18.
मरारी होसाहचे पुत्र:
शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).
हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा,
जखर्याह चौथा.
होसाहचे पुत्र व नातेवाईक मिळून एकंदर 13.
ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्याच प्रकारे सर्व विभाजित द्वारपालांना त्यांच्या पुढार्यांव्दारे याहवेहच्या मंदिराची सेवा देण्यात आली. प्रत्येक द्वारांसाठी, लहान थोर सारखेच समजून त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.
पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या1 नावाची चिठ्ठी निघाली.
उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.
दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.
पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली.
द्वारपाल पहारेकऱ्यांसह उभे असत:
पूर्वेच्या द्वारासाठी रोज सहा लेवी,
उत्तरेच्या द्वारासाठी चार रक्षक,
दक्षिणेच्या द्वारासाठी चार रक्षक
आणि भांडारावर एकाच वेळी प्रत्येकी दोन.
न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक.
हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.
खजिनदार व इतर अधिकारी
अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.
लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता. यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली:
मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता. एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
(हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत. लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत. शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
इसहार्यांपैकी:
कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
हेब्रोन्यांपैकी:
हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता.
(दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले. येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)
Source notes (1)
- Footnote किंवा मशेलेमाह
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.